सौमित्र,
पु. लं. नी म्हटल्याप्रमाणे समीक्षकानं एखाद्या कलाकृतीतली सौंदर्यस्थळं दाखवायचं काम करावं.... तुम्ही ते अतिशय सुंदर आणि सहजपणे केलं आहे.
१-२ प्रश्न. (खरं तर हे कवयित्री अदितीलाही आहेत)-
'भातुकली'चं कडवं शब्ददृष्ट्या जरी गोड वाटलं तरी 'भातुकली कुणाची' आणि 'भातुकली' हा शब्द का हे मला कळलं नाही.
(भातुकली हा खोटा-खोटा खेळ असतो आणि हा तर निसर्गाचा - निसर्ग अभिप्रेत असला तर- खरा नज़ारा आहे).
जास्त चिकित्सक वाटल्यास कृपया क्षमस्व. कवितेचा गोडवा या प्रश्नाशिवायही अनुभवता येतोय.
- कुमार
ता.क.
तुम्ही दिलेला दुवा धरून आधी कविता वाचली. तेव्हाही हा प्रश्न पडला. तुमच्या लिखाणातही उत्तर न मिळाल्यामुळे इथे लिहितोय.