कवितेतली नायिका आपल्या आजोळी आलीय आणि आजोळी घालवलेले दिवस जणू पुन्हा तिच्या समोर उभे राहताहेत.
मूळ कविता वाचताना ही कवितेची पार्श्वभूमी माझ्या लक्षात न आल्याने मला ही कविता फारशी कळली नव्हती. पण आपण दिलेल्या ह्या एका संदर्भावर सगळी कविता उलगडली आणि आवडली देखील. आपण केलेले रसग्रहण फारच छान आहे. इथल्या कवितांवर आपल्या सारख्या जाणकारांनी असे रसग्रहण (आस्वाद) दिले आणि मूळ कवी/कवयत्री यांनीसुद्धा त्यावर आपले विचार प्रकट केले तर माझ्या सारख्या कविता न समजणाऱ्यांना देखील पद्याची गोडी लागेल.
- वरुण.