एकंदर लुसलुशीत फसवी कविता आहे.
चोहीकडे तुझ्या । आभासांचा गाव
जाणीवांची धाव । तुझ्यापाशी
कुल्फीला काय म्हणायचे आहे? 'आभासांचा गाव' आणि 'जाणिवांची धाव' कानाला गोड.
वाचता वाचता दुनिया केवळ वेदनामय होते. सुंदर ठणकायला लागते.
काही ओळी छान आहेत, जसे -
वेदनांची नशा । सर्वांगा व्यापून
तुलाही लंघून । जाई आता
बहुतेक ही कविता दातांच्या ठणकेविषयी असावी. कुल्फीचा आणि दातांचा जवळचा संबंध आहे. कुल्फीने त्या ठणकेशी एकात्म व्हावे, असे 'कुल्फीला' सुचवायचे असेल.
पण थोडक्यात "पाण्याने पातळी । ओलांडली".
चित्तरंजन