कोर्टात म्हणजे न्यायालयात आणि शासकीय कामकाजात वापरले जाणारे खूपसे शब्द फारसीतून आले आहेत. वकील तसाच. याला फारा वर्षापूर्वी भाण्डूळ असा मराठी प्रतिशब्द कोणी सुचवला होता! गुन्हा, वासलात, हाजीर (हजर, गैरहजर), मुरवत,
वास्तविक दार हा प्रत्यय फारसी. आपण साक्शीदार असा धेडगुजरी शब्द बनवला. जाबदार, अर्जदार, शिरस्तेदार (कोर्टाचा कारकून), हवालदार, मुदत, जबानी, उलट, तपास,तपासणी, सरतपासणी, यादी, जबाब, फालतू (आवश्यकतेपेक्शा अधिक), ज्यादा(जादा), कमी, तक्रार, तक्रारदार, दावा, दावेदार, कब्जा, कब्जेदार, निशाणी, (नोटिस वगैरे)बजावणी, वर्दी, सामने(वाला), जाबदार (उत्तर देणारा), अम्मल(दार), हुकूम, मक्ता, नकाशा, दरखास्त, अर्ज, फर्मान, पेशी, पेशदार, खजाना (खजिना आणि खजीनदार) खास, आम (म्हणजे सर्व किंवा सामान्य या अर्थाने), कायदा, करार (करारनामा), सजा, रजा, पगार, अक्कल (मूळ शब्द अकल), नादार, तोशीस, नाझीर, मुनसब (मूळ शब्द मनसूबा), कारकून, हाजीर (पासून हजर आणि गैरहजर), मामला (पासून मामलेदार) असे कितीतरी 'इम्पोर्टेड' शब्द आपण फक्त कोर्टात किंवा सरकार दरबारीच नव्हे तर रोजच्या व्यवहारातही वापरतो. वाला,नामा (हुकूमनामा, राजीनामा, रोजनामा इ.) दर, दार, बे, गैर, खाना, हे प्रत्यय पुढे-मागे लावून बनवलेले बहुतेक सगळेच शब्द फारसीतून (काही अरेबिक तर अगदी थोडे उर्दू) 'इम्पोर्टेड' आहेत.
काही धेडगुजरी शब्द आपण बनवले. उदा. गैरव्यवहार, बेमुर्वतखोर, बेअक्कल, घोडेस्वार, वकीलपत्र (मूळ शब्द वकालतनामा), राजी-खुशी इ.
त्याकाळी सरकारी अम्मलदारांची नावे अशीच फारसी प्रशासनातली होती. आपल्या 'स्वराज्या'तही आपण ती कायम (हाही पुन्हा फारसी शब्द) ठेवली आणि पुढे जाऊन त्यांची आपण आडनावे बनवली. उदा. खासनीस,तोशनीस, हसबनीस, टिपणीस, फडणीस (फडणवीस), सरनौबत इ.