वात्रटा,
नांव वात्रट घेतलंस पण अगदी मनापासून भावनावश लेखन केलंस की ! अगदी माझे अनुभव कोणीतरी मलाच सांगतंय असेच वाटले - छान लिहिलेस, वाचताना डोळ्याच्या कडा पाणावल्या व उर भरून आला.

ते बर्फाचे गोळे, ऍल्यूमिनियम च्या कोनातल्या कुल्फ्या (टणटण घंटी वाजवत येणारी हातगाडी) ढकलगाडीवर ऊस पिळून काढणारा रसवाला, कधी तरी आइसक्रीमचा लाकडी पॉट, बर्फ, खडे मीठ घरी आणून बनवलेले आइसक्रीम, त्यासाठी हँडल फिरवून फिरवून दुखलेले हात..... किती आठवू व किती नको असे झालेय !

अभिनंदन !