आपला लेख अतीशय उत्तम आहे. अगदी निरागस सोपी ओघवती भाषा, तपशील सर्व पण उगीच लांबण कोठेच नाही. वाचकांना त्यांच्या भूतकाळात घेऊन जाणारा.
माझ्या "त्या" दिवसांना तर ४५-५० वर्षे झाली पण त्याच गमती आम्ही केल्या होत्या. आमच्या घरी थोडे बदल म्हणजे क्रिकेट ऐवजी विटी-दांडू, डबा ऐसपैस असे खेळ होते. पत्त्यांच्या जोडीला कॅरम होता.
तुम्ही फळांचा राजा रत्नागिरी हापूस/पायरी विसरलात वाटते. तसेच घरी बर्फ आणून आणि कोणाकडून मागून आणअलेल्या पॉट मध्ये केलेले केशर-पिस्ता किंवा आंबा आईसक्रीम पण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये झालेच पाहिजे.
शिवाय परीक्षेच्या २ महिने आधी, अभ्यासात व्यत्यय नको म्हणून वर फळीवर ठेवलेला रेडियो सुट्टीच्या पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहाने खाली येत असे. त्यावर मग सकाळच्या मंगलध्वनी पासून शास्त्रीय संगीत, रेडियो सिलोन, विविध भारती, भावगीते, आपली आवड, शनिवारच्या गाण्याच्या राष्ट्रीय सभा अशी सतत मोठया आवाजात आम्हाला सुट्टीभर साथ असे.
तुमच्या लेखनाने ह्या सर्व सुखद अनुभवांचा पुनःप्रत्यय आणून दिल्याबद्दल अत्यंत आभारी आहे.
कलोअ,
सुभाष