चाणक्य साहेब,
इतर चिरंजीवांच्या कथा मला माहीती नाहीत, पण अश्वत्थाम्याची कथा लहानपणी 'चांदोबा' मधे वाचल्यासारखी वाटते.(आणि आता माहीतीच्या महाजालावर दिसली.)ती इथे सांगत आहे. मनोगतवरील इतिहासतज्ञांनी चुका सुधाराव्यात.
दुर्योधनाचा भीमाशी झालेल्या द्वंद्वात पराभव झाल्यावर अश्वत्थाम्याने सूड घेण्याचा निश्चय केला. ५ निद्रीस्त पांडवपुत्राना पांडव समजून त्याने त्याना मारले. अर्जुनाने अश्वत्थाम्याशी यामुळे युद्ध पुकारले. युद्धात अश्वत्थामा व अर्जुन दोघानीही ब्रम्हास्त्रे वापरली. पण कृष्णाने मध्यस्थी करुन दोघाना ब्रम्हास्त्र मागे घेण्याची आज्ञा केली. अर्जुनाने ब्रम्हास्त्र यशस्वीरित्या मागे घेतले. मात्र अश्वत्थाम्याने ते ब्रम्हास्त्र उत्तरेच्या गर्भाकडे वळवले. आणि पांडवांचा निर्वंश झाला. कृष्णाने चिडून त्याला अमरत्वाचा शाप दिला आणि त्याच्या कपाळावरील मणी काढून घेतला.(ज्या मण्यात शक्ती होत्या.) तेव्हापासून अश्वत्थामा कपाळावरील जखम घेऊन जखमेसाठी तेल मागत फिरतो आहे.
आपली(ऐकीव)अनु