दूर गेलेल्या त्या उन्हाळ्याच्या दिवसांची आठवण काढलीत! मस्त वाटले . सी आय डी चित्रपटातील "हाय किस कंबख्त का नाम ले लिया !" असा दर्दभरा संवाद आठवला. आता कसली उन्हाळ्याची सुट्टी... ऑफिसमधल्या वातानुकूलनात उन्हाळाही सापडत नाही :((
मलाही उन्हाळाच सगळ्यात जास्त आवडतो... असो.
लेख खूपच मस्त झाला आहे. वात्रटराव.... लगे रहो!
--अदिती
जाताजाता->..... मला पतंग उडवायचा आहे. मी कधीच उडवला नाहीये तो... कोणी स्पेशल कोचिंग/क्रॅश कोर्स/गाईड+सूचना देईल का? प्रात्यक्षिक वर्ग घेतलेत तर फारच मजा येईल. या उन्हाळ्यात मनोगत पतंग कट्टा (किंवा शिबिर/संस्कारवर्ग) काढायचा का?