हे पवित्र सूत्र आहे. हे माझ्या आयुष्यासाठी महत्त्वाचे आहे. हे मी तुझ्या गळ्यात बांधतो. तू शंभर वर्षे सुखाने जग.
पती जर ह्या श्लोकाद्वारे पत्नीला तू शंभर वर्षे सुखाने जग असे म्हणतं आहे तर तिचं ते सुख आपण का हिरावून घ्यावं.
तू अधिकाराचा उल्लेख केला आहेस. तो बरोबरच आहे. तो सांसारिक सुखाचा अधिकार असतो. तो संपतो. म्हणून मंगळसूत्राचे प्रयोजन संपते.
सांसारिक सुख म्हणजे फक्त भौतीक सुख नाही आणि म्हणूण फक्त पतीच्या मृत्यूमुळे स्त्रीचा हा अधिकार संपत नाही. मंगळसूत्राचे प्रयोजन देखील संपत नाही. फक्त मंगळसूत्र न वापरल्यामुळे वैराग्य येत नाही पण त्याच मंगळसुत्रामुळे स्त्रीकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन विवाहीत स्त्री असा असतो जो आजच्या जगात स्त्रीचे रक्षण करतो. पतीची ती निशाणी त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा तिला साथ देते, तिचे रक्षण करते