माझेही मत तात्यांसारखेच आहे. हा प्रश्न अगदी वैयक्तिक आहे.
लग्न झालेल्या आणि पती हयात असलेल्या माझ्याही काही मैत्रिणी मंगळसूत्र घालत नाहीत. त्यातील काही जणी कुंकूही लावत नाहीत. त्याबरोबरच पतिनिधनानंतरही कुंकू लावणाऱ्या स्त्रिया तर आपण सर्रास पाहतो. ते आता समाजानेही स्वीकारले आहे. जर एखाद्या स्त्रीला पतिनिधनानंतरही मंगळसूत्र घालायचे असेल तर तिने ते अवश्य घालावे. सुरुवातीला नाके मुरडली जातील पण नंतर लोकांना सवय होईल.