कथा छान आहे.

एकूण कथानक पाहता खरे सोने जसे अशा परीक्षांमधून आणखी झळाळूनच बाहेर येते तसेच देवयानीदेखील या अचानक नैराश्यात नेणाऱ्या घटनेमुळे डोळ्यासमोर दाटलेल्या अंधारातच बुडून जाण्यापेक्षा त्यातून लवकरात लवकर सावरून एक ना एक दिवस नाव कमावून दाखवेलच याची खात्री वाटते. तिच्या अभिनयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असते तर वेगळा प्रश्न होता, मुद्दा केवळ छान संधी मिळण्याचाच आहे, त्यामुळे ती संधी मिळवण्यात तिला एकदा-दोनदा-तीनदा-दहादा जरी सो कॉल्ड नशिबाने तिची साथ दिली नाही तरी जाईल कुठे जाऊन जाऊन ते नशिब? तिच्या प्रयत्नांपुढे तुकवावीच लागेल मान त्या नशिबाला आणि द्यावीच लागेल तिच्या कष्टांना आणि सार्थ प्रयत्नांना साथ ! त्यामुळे धीर खचू न देता बोल ( Best Of Luck ) देवी !

अवांतर : कथेच्या चार भागांचे दुवे इतर वेळेस असतात तसे प्रत्येक भागात उपलब्ध करून दिलेले नसल्याने ते शोधून काढून वाचावे लागले. एकापेक्षा जास्त भाग असलेल्या लेखनाचे त्या भागांचे दुवे प्रत्येक भागात दिले जाण्याची सोय उपलब्ध करून घेण्यासाठी काही नियमावली असल्यास त्याची माहिती सर्व मनोगतींना कुठेतरी उपलब्ध करून दिलेली असती तर बरे झाले असते असे वाटते.