छाया राजेंच्या प्रत्येक वाक्याशी पूर्णतः सहमत.

लग्नामुळे पत्नीला जो अधिकार मिळतो, तोच पतीलाही मिळतो. जर ह्या अधिकाराचे प्रतिक अंगावर मिरवायचेच असेल तर ते दोघांनी मिरवावे. लग्नानंतर आणि लग्नामुळेच स्त्रीला सौभाग्य प्राप्त होते ह्या विधानाला तर माझा पूर्ण विरोध आहे. लग्नाचा आणि सौभाग्याचा संबंध असेलच तर मग पुरुषालाही लग्नानंतर(च) सौभाग्य प्राप्त होत नाही (तर ते लग्नापूर्वी, नंतर, पत्नीनिधनानंतरही अस्तित्वात असते) हे कसे? हा स्त्री-पुरुष भेद कशासाठी? पतिनिधनाने सौभाग्य संपते ही कल्पना तर अगदीच चुकीची वाटते, आजकालच्या जगात तर नक्कीच.

मलाही मंगळसूत्रामध्ये मिरविण्यासारखे काही आहे असे वाटत नाही. माझ्या दृष्टीने एखादीने मंगळसूत्र घालणे वा न घालणे ह्या गोष्टी वैयक्तिक आणि सारख्याच बिनमहत्त्वाच्या आहेत.