तू अधिकाराचा उल्लेख केला आहेस. तो बरोबरच आहे. तो सांसारिक सुखाचा अधिकार असतो. तो संपतो. म्हणून मंगळसूत्राचे प्रयोजन संपते.

वा गुरुजी!

बायको मेली की पुरुषाचाही अधिकार संपत असेल नाही का? तुम्ही त्या प्रवासीना ओळखता का? तेही छोट्या छोट्या गोष्टीतून संस्कृतीचे महत्व साम्गत असत. (ज्याना ते माहित आहे आणि पटलेले आहे अशानाच पुन्हा पुना!)

हल्लीच्या जगात हा सर्व बकवास आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. नवरा गेल्यावर स्त्री ने दुसरे लग्न का करू नये? अधिकार संपला हे सांगने ही तालिबनी पद्धत झली.

हल्ली अनेक महिला अशी भंपक बंधने पाळत नाहीत. माझ्या परिचयाहा काही वैधव्यातही मंगळसूत्र घालतात आणि कुंकू लावतात. आणि काही संसारातही मंगळसूत्र घालत नाहीत कुंकू लावत नाहीत.

यात काही बिघडले नाही, असे मला वातते.

(गुरुजी, असे मत दुसर्याकडून माम्डले जायला हवे, ह्या साठी तुम्हे तसे लिहिण्याची युक्ति केली की काय?)