> अधिकाराच्या गोष्टी करता आणि ज्या मंगळसूत्रामुळे तुम्हाला अधिकार मिळतात तेच घालण्यासाठी कमीपणा का वाटावा. त्याला काहीतरी स्थान आहे म्हणून तर ते लग्नात देवा-ब्राम्हणांच्या साक्षीने ते आपण पतीकडुन (भावी) गळ्यात घालतो.

"तुम्हाला अधिकार मिळतात" म्हणजे काय मनिशाताई? अधिकार फक्त स्त्रियांना नाही मिळत. पुरुषांनादेखील पती, पिता, जावई होण्याचे अधिकार मिळतात. समाजासमोर लग्नसंस्थेत पाऊल ठेवून दोघेही ह्या अधिकारांचा स्वीकार करतात. नुसते मंगळसूत्र गळ्यात अडकवून किंवा कपाळाला कुंकू लावून हे अधिकार नाही मिळत. त्यासाठी परस्पर सामंजस्याची, प्रेमाची आणि आदराची गरज असते. तसं नसतं तर गळ्यात मंगळसूत्र घालणाऱ्या कुठल्याच स्त्रीवर नवऱ्याकडून, सासू-सासऱ्यांकडून अत्याचार झाले नसते. हुंड्याच्या आगीत होरपळणाऱ्या त्या स्त्रियांच्या अधिकाराचे काय मनिशाताई?

>स्रीयांना मंगळसुत्र घालणे / न घालण्याने काहि फ़रक पडत नाही. हे जाणुन खंत वाटली.

खंत वाटण्याचे कारण कळले नाही. मी मंगळसूत्र नाही घातले तर माझे माझ्या नवऱ्यावर प्रेम नाही, असा त्याचा अर्थ होतो का? किंवा हाच प्रश्न असाही विचारते, माझे माझ्या नवऱ्यावरचे प्रेम सिद्ध करायला मंगळसूत्राचा आधार घेणे गरजेचे आहे का? अहो ते तर व्यवहारातूनच दिसतं की. मध्ये एका चित्रपटात पाहिलं, पोलिसांची धाड पडते तेंव्हा एक वेश्या गळ्यात मंगळसूत्र घालून पोलिसाला फसवते. मंगळसूत्राचा असाही वापर होतोच की. मंगळसूत्र घालूनही स्वैराचार करणाऱ्या स्त्रिया नाहीत, असे म्हणता येईल का? मग एक दागिना ह्याहून जास्ती काय महत्त्व राहते मंगळसूत्राचे?

> शेवटी "मंगळसूत्र" घालावे की नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे.!

सहमत.