मंगळसुत्र घालणे हा वैयक्तिक प्रश्न आहे हे मान्य. पण विधवेने पण घालावे? अर्थात पुनःविवाहानंतर घालायला काही हरकत नाही.
मला फक्त एकच मुद्दा मांडावासा वाटतो ... मंगळसूत्र ही काही शोभेची माळ
नाही, काही कारणास्तव एक विशिष्ट प्रकारच्या माळेलाच आणि विशिष्ट वेळी
घातल्या गेलेल्या माळेलाच मंगळसूत्र म्हणतात. मिरवणे/संरक्षण इ. इ. काहीही
कारण असले तरी तो एक संस्कृतीचा(?) भाग आहे. आणि पुरुषही लग्नानंतर अंगठी घालतातच की!
असो ... पण मग कुमारिकेने केवळ आवडते म्हणून मंगळसूत्र ( त्याचं काय आहे ... दुकानातल्या सगळ्या माळांमध्ये आम्हाला हीच आवडली!!!) घालण्याबद्दल काय मत आहे आपले ?
--परीक्षित