पण त्याच मंगळसूत्रामुळे स्त्रीकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन विवाहित स्त्री असा असतो जो आजच्या जगात स्त्रीचे रक्षण करतो.
बरोबर !!!
ही गोष्ट आजही लागू होते ही दुःखाची गोष्ट असली, तरी कदाचित पूर्वी जेंव्हा पुनर्विवाह समाजात नव्हते तेंव्हा मात्र पतिदुःखामुळे भौतिक सुखांचा त्याग करून वैराग्याचे सोंग* आणणाऱ्या स्त्रियांचे मात्र संरक्षण** होत असावे असे वाटते.
असो ... काळाप्रमाणे प्रथाही बदलतात आणि त्या बदलल्याच पाहिजे ... पण वाईट गोष्टी टाकून देण्याच्या नावावर त्याचा अतिरेक बरोबर नाही.
टिकली लावल्याने कपाळावरील कोणतासा accupressure point दाबला जातो असे कधीतरी ऐकले होते !!!
--परीक्षित
* इथल्या पुरोगामी लोकांना पटावे म्हणून हा शब्द वापरतो आहे, सर्वच स्त्रियांना ते लागू होईल असे वाटत नाही.
** कोणत्याही 'उदास' स्त्रीवर अतिप्रसंग झाल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही.
त्यामुळे त्याकाळी शास्त्रकारांना विधवा स्त्रियांना असा सल्ला देणे योग्य
वाटले असावे.