> मंगळसुत्र घालणे हा वैयक्तिक प्रश्न आहे हे मान्य. पण विधवेने पण घालावे?

वैयक्तिक प्रश्न आहे म्हणता आणि विधवेने घालू नये असेही म्हणता. विधवांना वैयक्तिक मत नसते का?

> मंगळसूत्र ही काही शोभेची माळ नाही, काही कारणास्तव एक विशिष्ट प्रकारच्या माळेलाच आणि विशिष्ट वेळी घातल्या गेलेल्या माळेलाच मंगळसूत्र म्हणतात

मग विशिष्ट वेळी न घातलेल्या पण त्या विशिष्ट प्रकारच्या माळेसारख्या दिसणाऱ्या माळेला मंगळसूत्र का म्हणावे? आणि तसे म्हणणे योग्य नसेल तर अविवाहित स्त्रियांनी घातली अशी माळ तर काय बिघडले?

> आणि पुरुषही लग्नानंतर अंगठी घालतातच की!

निदान हिंदू धर्मात तरी विवाहित पुरुषांनीच अंगठी घालावी अशी काही प्रथा नाही.

> पण मग कुमारिकेने केवळ आवडते म्हणून मंगळसूत्र ( त्याचं काय आहे ... दुकानातल्या सगळ्या माळांमध्ये आम्हाला हीच आवडली!!!) घालण्याबद्दल काय मत आहे आपले ?

माझा दुसरा मुद्दा वाचावा. शिवाय, (आपल्यामते सौभाग्यप्रतिक असलेली) अंगठी अविवाहित पुरुषांनी घालण्याबद्दल आपले मत काय आहे? (त्याचं काय आहे, आमच्यासाठी दागिन्यांचे फारसे प्रकार नसल्यामुळे लग्न होईपर्यंत अंगठी न घालणे म्हणजे फारच होईल बुवा!!) तसा अंगठी घालणे हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण विधुरांनी पण घालावी? ह्यावर आपले मत वाचायला उत्सुक आहे.