माझा दुसरा मुद्दा वाचावा. शिवाय, (आपल्यामते सौभाग्यप्रतीक असलेली) अंगठी अविवाहित पुरुषांनी घालण्याबद्दल आपले मत काय आहे? (त्याचं काय आहे, आमच्यासाठी दागिन्यांचे फारसे प्रकार नसल्यामुळे लग्न होईपर्यंत अंगठी न घालणे म्हणजे फारच होईल बुवा!!) तसा अंगठी घालणे हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण विधुरांनी पण घालावी? ह्यावर आपले मत वाचायला उत्सुक आहे.


केवळ वादाला प्रतिवाद म्हणून नाही ... पण विवाहित पुरूष एका ठराविक बोटातच अंगठी घालतात.

असो ... माझा व्यक्तीस्वातंत्रावर पूर्णं विश्वास आहे. आणि या सर्व गोष्टी नियम नसून सूचना आहेत असे वाटते ... निदान आजच्या युगात तरी. कितीतरी विवाहित पण मंगळसूत्र न घालणाऱ्या मुली मलाही माहीत आहेत, आणि कोणीतरी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच विधवा महिलाही टिकली लावतात. समाज ते काही प्रमाणात स्वीकारतोही. पण या स्वातंत्राचा किती आणि कसा वापर करावा याला मात्र काही मर्यादा असाव्यात.

काही महिला मंगळसूत्राला सौभाग्याचे लक्षण मानतात, तेंव्हा इतरांनी त्याचा मान राखावा, उगाच त्याला काही अर्थ नाही असे त्यांना पटवण्याचा प्रयत्न का करावा? किंवा एकदा घातले, आता काढणार नाही असाही अट्टाहास का करावा? काही प्रथा प्रचलित आहेत आणि त्या अमानुष/अत्याचारी नाहीत तरीही विरोध का?

किंवा असे तर नाही,की मंगळसूत्र ही तुझ्या नवऱ्याची भेट होती, आता तो नाही, तर या सर्व गोष्टी विसर आणि एका नव्या आयुष्याला सुरवात कर! जसे मध्ययुगात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले होते, पण त्यांपूर्वी विदुषी होत्याच ना. कदाचित शास्त्रकारांचा मूळ हेतू हा देखिल असू शकतो.

मला हेच सांगायचे आहे, की अशा गोष्टींशी भावनिक संबंध असतो. दर वर्षी बहिणी राखी पाठवतात ... तसे पाहिले तर तो एक रेशमाचा दोराच ना? ज्यांना बहीण नसते, ते कोणालातरी बहीण मानतात आणि त्यांच्याकडून राखी बांधून घेतात, दुकानातून आणून बांघत नाहीत (हेही तसे एक गृहीतकच आहे ... पण तुम्हाला पटेल अशी आशा करतो).

असो ... विषयांतर करायचा हेतू नव्हता. पण अशा काही गोष्टींमुळे/प्रथांमुळे काही अवघड गोष्टी लोकांना सहज कळतात आणि त्यामुळे नकोत्या विषयांवर (awkword) चर्चा टाळता येते. अर्थात ते कळूच द्यायचे नसेल तर मात्र या प्रथांचे पालन करण्याची गरज नाही.

जाऊदेत ... जुन्या गोष्टी टाकून देणे/विरोध करणे सोपे असते, नवीन गोष्टी सुचवणे त्यांहूनही सोपे असते ... पण त्या तशा प्रथा का अस्तित्वात आल्या हे जाणून न घेता त्याचा स्वीकार किंवा त्याग करणे मात्र योग्य नाही असे माझे मत आहे.

त्यामुळे विधवांनी मंगळसूत्र का घालू नये पेक्षा, विवाहित स्त्रियांनी मंगळसूत्र घालण्यामागे काही शास्त्रीय कारण असू शकतं का? टिकली/गंध लावल्याने खरंच कुठला  accupressure point  कार्यान्वित होतो का? श्राद्ध घालणे म्हणजे नुसतीच कावळ्याला खाऊ घालून अन्नाची नासाडी की त्यामागे काही भावनिक बंध आहेत (याला शास्त्रीय कारण नक्कीच असू शकत नाही ... किंवा माझे हे मत चूकही असू शकते.) ? अशा गोष्टींवर चर्चा करायला अधिक आवडेल.

--परीक्षित