बहुतांश सर्वच मुद्द्यांशी सहमत-
मलाही कित्येक मुली माहीत आहेत ज्यांनी लग्नानंतर (!) मंगळसूत्र काढून ठेवले आहे. लग्नमंडपात कदाचित त्यांनी तशी अट नवऱ्याला घातलेली असावी !
'आज घालून घेते तुझ्या हातून मंगळसूत्र, पण नंतर मात्र (नवलाई संपली की) काढून ठेवीन !'
कित्येक प्रथा कर्मठ म्हणून समजल्या जातात.
राखी बांधणे, श्राद्ध घालणे, सत्यनारायणाची पूजा करणे इ.
मग त्यात ही एक भर पडली तर काय हरकत आहे ?
ज्यांना जे वाटेल तेच करावे हे मात्र खरच आहे !