विधवांना मानभावी उदारतेने अधिकार देणारे शास्त्र माझ्या संस्कृतीत आहे हे वाचून लाज वाटली. अधिकार वाटणारे हे कोण कळले नाही. सर्वसामान्य माणूस म्हणून जगण्याचा, पूजा प्रार्थना करण्याचा, सण समारंभ साजरे करण्याचा अधिकार कोणी कोणाला द्यावा लागत नाही. तो असतोच. शिवाय आपल्या प्रदेशात एखादी स्त्री विधवा आहे हे कळल्यावर तिला समाजकंटकांचा उपद्रव होऊ शकतो हे वाचूनही लाज वाटली.

'इतर धर्मात' विधवांना काही विशेष अधिकार नाहीत! कारण त्यांच्यावर काही विशेष बंधने नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे ख्रिश्चन धर्मात पतीनिधनानंतर पतीच्या संपत्तीतील काही हिस्सा (१/२ किंवा १/३) पत्नीला मिळतो. पत्नीने पुनर्विवाह करण्यास कोणतीच आडकाठी नसते. तसेच मुस्लिम धर्मातही विधवेला पुनर्विवाह करण्यास काही प्रत्यवाय नसतो. (संपत्तीच्या वारसाहक्काबद्दल कल्पना नाही.) इतर धर्मात विधवांसाठी पोशाखाची, प्रसाधनाची आचारसंहिता असल्याचे कधी वाचनात आले नाही. तसे पहायला गेल्यास, हिंदूधर्मातही पुष्कळ जातीत विधवाविवाह संमत आहेत (उदा पाट लावणे, चादर धरणे वगैरे).