लहान मुलांची मानसिकता दाखवण्याचा प्रयत्न केला होता. बहुदा वाचकांपर्यंत पोहचवण्यास कुठेतरी कमी पडलो.
स्वामी व डॉ.पवित्र ह्यांच्या पद्धती सारख्या होत्या. विसूशी एकांतात बोलल्यावर त्याचे नेमके प्रश्न त्यांच्या लक्षांत आले. स्वामींनी आजींना बोलावले होते ते विसूला 'ओव्हर प्रोटेक्शन' देऊ नका हे सांगायला (हे आजीत झालेल्या बदलावरून कळेल).
विसूला मित्र फक्त एकच होता- वडाचे झाड ! जर लहानग्यांना इतर मित्र नसतील तर साहजिकच ते एकलकोंडे होण्याचा संभव असतो. एकटेपणा मुलाला तर सोडाच माणसालाही वेडा करू शकतो.
खेळणी हा भागही मुलांच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो.
आई वडिलांनी मुलांच्या अभ्यासात लक्ष दिल्यास मुले किती बदलू शकतात हे थोडक्यात सांगण्याचा प्रयासही फसला. माझ्या मते मी शेवट घाईत 'रॅप अप' केलेला दिसतोय !
असो... पुढील कथेच्या वेळी नक्कीच ह्या सर्वांची काळजी घेईन !
धन्यवाद-