धन्यवाद

तुम्हा सर्व मनोगतींना माझे धन्यवाद! तुम्ही ज्या प्रतिक्रिया माझ्या 'मंगळसूत्र' या लेखाला दिल्यात त्यांचा साकल्याने विचार करुन मी हा प्रतिसाद देत आहे. सर्व प्रथम एक सांगते की मी मांडला तो विचार होता; हट्ट नव्हता आणि नाहीदेखील. विवाहीत स्त्रीने मंगळसूत्र घालावे का नाही याबद्दल मी लेखात कोणतेच मत व्यक्त्त केलेले नाही. पण विधवा स्त्रीने मंगळसूत्र काढू नये असा विचार मात्र मी नक्कीच मांडलेला आहे. माझ्या या विचारामध्ये कुठेही compultion नाही.

लग्न झालेल्या स्त्रीया; हल्ली मंगळसूत्र घालत नाहीत, कुंकू लावत नाहीत या गोष्टींशी माझ्या विचारांचा काहीही संबंध नाही. मी देखील 'मंगळसूत्र घालावे का घालू नये' हा प्रत्येक स्त्रीचा वैयक्त्तीक प्रश्न आहे या विचाराशी  सहमत आहे.  माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की स्त्रीने मंगळसूत्राकडे दागिना म्हणून पाहू नये. स्त्रीवादी (?) दृष्टीकोणातून जर विचार केला तर स्त्रीने कोणतेच सौभाग्य अलंकार वापरता कामा नयेत. कारण हा स्त्रीवादी नामक जो काही प्रवाह आहे त्यात केवळ स्त्री - पुरुष तुलना आहे; जी मला मान्य नाही. कारण स्त्री पुरुष हा भेद निसर्गाने केलेला आहे. आता स्त्रीच्याच गळ्यात मंगळसूत्र नामक सौभाग्य अलंकार आणि पुरुषाला मात्र एकही सौभाग्य अलंकार नाही; असे आपल्या शास्रामध्ये का आहे? हे ते शास्र लिहीणाऱ्यालाच जाऊन विचारावे लागेल. आपण ज्या गोष्टी बदलण्याचा विचार करु  शकतो त्याचाच आपण उहापोह करायला पाहीजे.

आता विधवा स्रीने मंगळसूत्र घालावे या विचारामागे केवळ समाजापासून संरक्षण एवढाच हेतू नाही. कारण आजकाल विवाहीत स्रीवर देखील अतिप्रसंग करणारे नराधम या समाजात आहेत. मंगळसूत्र हा दागिना मानला की नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्यामध्ये वारसाहक्क येतो; कारण दागिना म्हणला की सोने आले. आणि जर एखाद्या दागिन्याचे महत्व आयुष्यभरासाठी संपणार असेल तर त्याची किंमत मोजली जाते. स्रीच्या या अधिकाराची किंमत होऊ शकत नाही आणि अधिकार मिरवले जात नाहीत. मी जर लेखात असा 'मंगळसूत्र मिरवणे' असा उल्लेख केला असेल तर तो अनवधानाने आलेला आहे. 'मंगळसूत्र ही मिरवण्याची गोष्ट नाही' या मताशी मी १००% सहमत आहे.

माझ्या एक गोष्ट नंतर लक्षात आली ती म्हणजे तरूण वयात नवरा गेल्यावर जर स्रीने मंगलसूत्र घातले तर तिच्या पुनर्विवाहात अडचणी येतील. हा प्रश्न कसा सोडवावा????

परंतु एकूणात मला सांगायचे एवढेच आहे की या मंगळसूत्रामुळे स्रीचे आयुष्य बदलते. तिला अनेक जबाबदाऱ्या त्यानंतर पार पाडाव्या लागतात. आयुष्यभर स्री मेहतीने घर उभं करते. केवळ तिचं आपलं माणूस गेलं की तिची किंमत रहात नाही. स्रीला मिळणारा मानसन्मान ही त्या मंगळसूत्राशी आणि त्या मंगळसूत्राच्या धन्याशी निगडीत असतो. (स्रिवाद्यानो माफ़ करा. माझे विचार तुमच्यासाठी काळानुरुप नसतील; पण बदलत्या काळातही ते असेच ठाम रहाणारे आहेत.)म्हणून त्या मंगळसूत्राची किंमत करु नये आणि जर स्रीच्या मृत्यूपर्यंत जर ते तिच्या गळ्यात रहीलं तर त्याची आब राखली जाईल असं मला वाटतं.

धन्यावाद,

सोनल