जुन्या गोष्टी टाकून देणे/विरोध करणे सोपे असते, नवीन गोष्टी सुचवणे त्यांहूनही सोपे असते ... पण त्या तशा प्रथा का अस्तित्वात आल्या हे जाणून न घेता त्याचा स्वीकार किंवा त्याग करणे मात्र योग्य नाही असे माझे मत आहे.
त्यामुळे विधवांनी मंगळसूत्र का घालू नये पेक्षा, विवाहित स्त्रियांनी मंगळसूत्र घालण्यामागे काही शास्त्रीय कारण असू शकतं का? टिकली/गंध लावल्याने खरंच कुठला accupressure point कार्यान्वित होतो का? श्राद्ध घालणे म्हणजे नुसतीच कावळ्याला खाऊ घालून अन्नाची नासाडी की त्यामागे काही भावनिक बंध आहेत (याला शास्त्रीय कारण नक्कीच असू शकत नाही ... किंवा माझे हे मत चूकही असू शकते.) ? अशा गोष्टींवर चर्चा करायला अधिक आवडेल.
२००% सहमत.
अशा मुद्द्यांवर वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचारप्रवण करायला लावणारी चर्चा नव्याने कोणी सुरू केल्यास अथवा मी आधीच सुरू केलेल्या साधारण अशाच संदर्भातल्या रुढींमागे दडलंय काय? या चर्चेतले मुद्दे योग्य वाटून तिथे नवनविन विषय मांडून त्यावर सर्व बाजूंनी विचार होत मतप्रदर्शने झाल्यास, शतकानुशतके चालत आलेल्या रुढी तयार झाल्या तेव्हा त्यांच्यामागील तत्कालीन कार्यकारणभावाला मान देत आजच्या काळातली त्या कार्यकारणभावाची योग्यायोग्यता शोधायला मीही उत्सुक आहे.