सर्वसामान्य माणूस म्हणून जगण्याचा, पूजा प्रार्थना करण्याचा, सण समारंभ साजरे करण्याचा अधिकार कोणी कोणाला द्यावा लागत नाही. तो असतोच.
त्याबद्दल वाद नाहीच ! मृदुला देवी, एक लक्षांत घ्या.... मी कुठेही कुणाच्याही व्यक्ती स्वातंत्र्यावर वा कोणत्या व्यक्तीने काय करावे किंवा काय करूच नये ह्याबद्दल माझे मत लादण्याचा प्रयत्न केलेला नाही. उगीच आपण किंवा इतर कोणीही माझ्या लेखी अशी वाक्ये घुसडण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती !
स्पष्ट शब्दांत सांगायचे तर ह्या बद्दलचे माझे विचार मी तात्या अभ्यंकरांना खाली दिलेले आहेतच त्यावरून नजर फिरवावी. हे परत परत येथे लिहावे लागतेय हेच माझे दुर्दैव !
दुसरे - स्त्रियांच्या कुठल्याही रूढी परंपरा वा हुंडा तत्सम पद्धती अंगिकारण्यास पुरुषांनी पुढाकार घेतल्या बद्दल मला शंका आहे. इव्हन आजच्या संगणक युगातही स्त्रीची सर्वात मोठी शत्रू स्त्रीच आहे !
शिवाय आपल्या प्रदेशात एखादी स्त्री विधवा आहे हे कळल्यावर तिला समाजकंटकांचा उपद्रव होऊ शकतो हे वाचूनही लाज वाटली.
का ? हे त्रास फक्त विधवांनाच होतात ? मुलींना, स्त्रियांनाही होतातच ना !
व येथे भारतातच नाही तर लंडन मध्येही होतात !
आता हे सांगण्याचा प्रयत्न करूच नका की भारत सोडून इतर ठिकाणी महिलांना असे त्रास होत नाहीत !
'इतर धर्मात' विधवांना काही विशेष अधिकार नाहीत! कारण त्यांच्यावर काही विशेष बंधने नाहीत.
माफ करा, ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन कुटुंबांना मी फार जवळून बघितलेले आहे. आजही त्यांच्या धर्मात विधवांना ज्या रितीने वागवले जाते ते बघून कमीत कमी कित्येक वर्षोंपूर्वी आपल्या धर्मात असे अधिकार देऊन ठेवले होते ते बरेच होते.
माझा सर्वात जवळचा सहकारी व भागीदार केरळी ख्रिश्चन असून त्याच्या धर्मात आजही विधवांना जाचकच नव्हे तर हुंडापद्धतही अस्तित्वात आहे.
मी हा मुद्दा जो मांडला आहे तो १९५२ सालच्या (कुणास ठाऊक कितवी एडीशन) पुस्तकातला होता व असे अधिकार कदाचित १०० वर्षांपासूनच अस्तित्वात असावेत. इतक्या वर्षांपूर्वी धर्मपंडितांनी ह्या पुरोगामी विचारांचा पाठपुरावा केला होता ह्या गोष्टींचे खचितच मला नवल वाटते.
आपण सर्व आजच्या युगांतले आहोत- आज ज्या अत्याधुनिक गोष्टी अस्तित्वांत आहेत त्यांचा वापर करून आपण किंवा इतर जे लिहीत आहेत ते लिहिणे अत्यंत सोपी गोष्ट आहे. कारण सर्वांचेच विचार एकसमान आहेत.
आजच्या युगांत जाती पाती व धर्माच्या सर्व भिंती जवळपास नष्ट झालेल्या असताना ह्या पुरोगामी विचारांचा प्रसार करणे सोपे जात आहे.
परंतू १०० वर्षांपूर्वी किंवा अगदी ७५ वर्षांपूर्वीचे हे ग्रंथातले विचार अभ्यासल्यास ते पुरोगामी नव्हते असे आपल्याला म्हणायचे आहे का ?
इतकेच लांब का जावे.... आपण आपले हेच विचार आपल्या आजी आजोबांबरोबर चर्चेला घ्या व मग त्यांची मते ऐका. कदाचित 'ह्याच्याशी / हीच्याशी वाद नको' म्हणून ते सोडून देतील पण त्यांच्या काळातल्या रूढी/परंपरा ते सोडतील का ?
माझ्या माहितीप्रमाणे ख्रिश्चन धर्मात पतीनिधनानंतर पतीच्या संपत्तीतील काही हिस्सा (१/२ किंवा १/३) पत्नीला मिळतो.
१/२ किंवा १/३ किंवा १/४ - ह्या गोष्टींना काय अर्थ आहे ? येथे पूर्ण अधिकारांसंबंधी चर्चा सुरू आहे !
पत्नीने पुनर्विवाह करण्यास कोणतीच आडकाठी नसते.
पुनर्विवाह ? आडकाठी ? मी तसे काही म्हटल्याचे आठवतच नाही ! व आपल्याही धर्मात कुठे अशी आडकाठी असते ? उगीच मुद्द्यांना 'ट्विस्ट' करण्यात काय अर्थ आहे ?
मंगळसूत्र घालावे की नाही, ते किती तोळ्याचे असावे, ते लग्नमंडपात घालून नंतर काढून ठेवावे का, विधवेने घातल्यास का घालावे, केंव्हा घालावे हे सर्वच मुद्दे व्यक्ती सापेक्ष आहेत.
जर हा व्यक्तीगत प्रश्न असल्याचे मान्यच आहे तर वादच कुठे येतो ?
उगीच विषयाला पिळणे चालू असल्याचे माझे मत आहे !
असो.... हा विषय मी ह्या प्रतिसादानंतर माझ्यापुरता बंद करीत आहे.
धन्यवाद !