छान लेख! मला उन्हाळा आवडायचा तो मोठ्या सुट्टीमुळेच. गोष्टींची पुस्तकं वाचायला, खेळायला भरपूर वेळ मिळणार म्हणून. शाळेतून सुटका हे मुख्य!

दरवेळी शिपाई कसलेतरी परिपत्रक घेउन वर्गात आला की मुलांची कुजबुज सुरु होई.
आमच्याही वर्गात शिपाई परिपत्रक घेऊन यायचा. वर्गावर असलेले शिक्षक आधी मनातल्या मनात ते वाचून मग आम्हाला वाचून दाखवायचे... बरेच वेळा कुणाच्या तरी दुःखद निधनामुळे उद्या शाळा बंद राहील अशी सूचना असायची. हे वाचून होताच बाकं बडवून आनंद  व्यक्त व्हायचा. सुट्टी मिळाल्याचा!  तुमचा लेख वाचून हा प्रसंग आठवला...