कथेच्या शेवटाबाबत शशांक रावांशी सहमत. कथेची शैली आणि वेग छान आहे. निरंजन स्वामींनी केलेले काउन्सीलींग लक्षात आले. त्यांनी विसूला विश्वासात घेणे (वड बोलतो ह्यावर विश्वास ठेवून) आणि विसूवर सर्वात जास्त प्रभाव असणाऱ्या त्याच्या आजीला बोलावणे हे सर्व पटले.
परंतू डॉ. पवित्र ह्या पात्राचे प्रयोजन कळले नाही. डॉ पवित्र ह्यांनी विसूच्या वडीलांना काउन्सीलींग केले, आणि त्यांना 'विसूच्या अभ्यास घेणे', 'त्याच्याशी संवाद साधणे' अश्या सूचना दिल्याचा उल्लेख कथेत असता तर, निरंजन स्वामी आणि डॉ. पवित्र ह्या दोघांचाही वाटा विसूच्या बरे होण्यामध्ये दिसला असता. आणि शेवट अधीक परीणामकारक करता आला असता असे वाटते.
कथेवर पकड मात्र चांगली आहे.
वरुण.