मी पुण्यात राहतो. इथे परराज्यांतून शिकायला येणारी बरीच मुले, मुली एकत्र राहतात (सर्व नाही). त्यामुळे आपल्या अनुभवाचे नावीन्य मला वाटले नाही. त्यांच्यातील वैयक्तीक संबंधांबद्द्ल मी कधी उत्सुकता दाखवली नाही. परंतु अशा गोष्टी लपून रहात नाही.
योग्य-अयोग्यतेच्या संकल्पना मोडून पडताहेत. ४-५ वर्षांपूर्वी उच्चभ्रू वस्त्यांमधे चालणारे हे प्रकार आता मध्यमवर्गापर्यंत पोचले आहेत. पुढच्या १५-२० वर्षांत यात काय प्रगती (?) होईल हे निश्चित सांगणे कठीण आहे. पण त्याचा अंदाज माझ्या पिढीला आला आहे. आणि तशी त्यांची मानसिक तयारीही होत आहे. अर्थात भावी परीस्थितीचा अंदाज आला, तरी परीणामांची कल्पना फारशी कुणाला आली असेल असे मला वाटत नाही.