साडी,नऊवारी, पंजाबी ड्रेस यासारख्या पारंपारिक पोशाखांबरोबर कुंकू किंवा टिकली चांगली दिसते हेही एक कारण आहेच. मंगळसूत्र,जोडवी,बांगड्या/पाटल्या,हल्ली मराठी मुलीही फॅशन म्हणून लावत असलेला सिंदूर,टिकली मागे 'मी आता  विवाहीत आहे, माझ्या जीवनपद्धतीत आणि राहणीत बदल झाला आहे,मंगळसूत्र,बांगड्या,टिकली यांनी मी आता सौंदर्य खुलवण्याबद्दल जागरुक राहते आणि चांगले दिसल्याने मला आत्मविश्वास वाटून मी प्रसन्न दिसते' हे एक आणि पैसे इ. चोरीला गेल्यास नेहमी जवळ बाळगता येण्यासारखे पण काळे मणी असल्याने चोरट्यांच्या त्या मानाने कमी नजरेत भरणारे(याला अपवाद म्हणजे सोन्याचे ५ तोळ्याचे मंगळसूत्र घालून त्यात उपचारापुरते चार काळे मणी घालणाऱ्या बायका) असे एक ऍसेट प्रत्येक बाईजवळ असावे हे उद्देश असावे (असे वाटते.)