मीराताई,कथा आवडली. अनुवाद हा साहित्यप्रकार कमी दर्जाचा माननारे अनेक जण आहेत, पण मी त्यांच्याशी सहमत नाही. जगातल्या अनेक भाषांतलं उत्तमोत्तम साहित्य मराठीत आणण्याचं महत्वाचं काम अनुवादकार करतात जे निश्चितच उल्लेखनीय आहे.(जाताजाता सहज सांगतो, या विषयाचे चांगले विवेचन शांता शेळके यांनी त्यांच्या 'धूळपाटी' या पुस्तकात केले आहे.)
तुमची ही कथा मी आधीच वाचली होती, पण पुन्हा एकदा वाचली. तुमचा अनुवाद चांगला जमलाय. तुमची भाषा अगदी साधी, सोपी नि प्रवाही आहे, त्यामुळे वाचताना आनंद झाला. एका मालिकेत (चक्क मराठीत) ह्या कथेवर आधारित एक भाग पाहिल्याचेही स्मरते. तुम्हाला आठवते का असे काही?
एक_वात्रट