मतला भारी आहे. मनोगतामुळे आम्हा लोकांचा प्रश्नच मिटला असला तरी
शोधावयास श्रोते, चल कोस कोस आता
यात विदारक सत्य आहे.एक क़िस्सा आठवला-
हैदराबादचा प्रसिद्ध कवी मक़दूम मोहिउद्दीनला काही नव्या गझला झाल्या पण त्या दिवशी श्रोता भेटला नाही. मग शेवटी तो नेहमीच्या बारमध्ये गेला. आणि आपल्या नेहमीच्या वेटरला पकडले. स्वत: कोरडा राहिला पण त्या वेटरला दारू पाजून-पाजून गझला गंभीरपणे ऐकविल्या.
एका तासाने झिंगलेला वेटर मक़दूमला म्हणाला, "मक़दूम साहब अब बस भी करो, आपको बहोत चढ़ गयी है. आपके होश ठिकानेपर नहीं है."
तर-
अंडी फळे टमाटू घेऊन लोक आले
पळ तू उपाय हेही करतील ठोस आता!
हाहाहाहा. इथे ठोस काफिया छान बांधला आहे. गाढवांचे स्थलांतरही आवडले. छान, माफी!