> कोणत्याही 'उदास' स्त्रीवर अतिप्रसंग झाल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही. त्यामुळे त्याकाळी शास्त्रकारांना विधवा स्त्रियांना असा सल्ला देणे योग्य वाटले असावे.

हे वाचून दुःख झालं. मृदुलानं तुम्हाला उत्तर दिले आहेच वरती. पण तरिही पुन्हा सांगावेसे वाटते. अतिप्रसंग करणारे लोक विकृत असतात. स्त्रीला केवळ "मादी" ह्या रुपात बघतात. ती स्त्री विधवा असो, सधवा असो, ३ वर्षाची चिमुरडी असो की ६० वर्षाची वृद्धा. त्यांना काहीच फरक पडत नाही. मग असे लोक तिच्या भावनांना जोखण्याचा प्रयत्न करत असतील असा विचार मनात आणणेदेखील चुकीचे आहे.

आणखी एक, विधवा स्त्रिया नेहमी 'उदास'च असतात हे गृहीतक आपण कसे ठरवले हे सांगाल तर बरे होईल. की त्यांनी तसे असावे असा आपण संकेत करत आहात?