मृदुला,

 

आपले प्रश्न समजले.

वांगी केव्हा घालायची? कांद्यानंतर का? सुकी करायची असेल तर कमी पाणी घालायचे की अजिबात घालायचे नाही? (अजिबात घातले नाही तर मसाला जळेल का?

वांगी कांदा गुलाबी रंगावर आल्यावर त्यात काश्मिरी लाल मिरची पावडर (लाल ऱंग येणारा तिखट मसाला असेल तरी चालेल.) घातल्यानंतर, लाल मसाला थोडा भाजला कि वांगी घालवित. मसाला जळु देऊ नये. सुकी करायची झाल्यास झाकण ठेऊन त्यात पाणी ओतावे. गॅस मंद ठेवावा. भाजीत पाणी घालु नये. मसाला जळत नाही.

अहो, भाजी चांगली तर ३ माणसांना देखील पुरणार नाही,  (गंमंत) हे प्रमाण ४-५ जणांसाठी आहे. प्रत्येकी १ वांगे आवडीप्रमाणे घ्यावे.