आपली सर्व मते पटली आहेत पण मला एक तरी अशी राजकीय पार्टी दाखवा जी ह्या बद्दल ठोस उपाय करण्या साठी तयार आहे . आज मला मतदानाचा हक्क मिळुन ७ वर्षे झाली पण मी अजुन ही एकदा ही मतदान केले नाही कारण मला तरी सध्या आपल्या देशा मध्ये अशी संस्था अथवा संघटन दिसत नाही आहे जी देशा साठी कार्य करीत आहे सर्व येथे आपल्याच संघटने साठी अथवा पार्टि साठी काम करीत आहेत. काल संध्या काळी झालेल्या वाराणसी विस्फोटानंतर ची आपल्या राजनेत्याची भाषणे पहा.  खरोखरच मला खेद वाटतो की १०० कोटीच्या वरील जनसंखे मध्ये आपल्या ला एक सडेतोड , फक्त देशा साठी कार्य करणारी संघटना अथवा संस्था भेट्त नाही आहे. ह्या चा अर्थ असा नाही आहे की मी निराश वादी आहे माझा आशावाद अजुन ही बलवान आहे व मला खरोखर असे वाटते कधी तरी एकादा सरफीरा... भगतसिंग, राजगुरु , सावरकर ह्यांचा सारखा देशाचे भविष्य बद्लु शकेल.

वंदे मातरम.