अनेक तरुणींच्या डोळ्यासमोर काही काळ असे अनेक 'तो' असतात.. कॉलेजचं जीवनच गुलाबी.पण या गुलाबी जीवनात पण 'कुणालातरी आपण आवडतो' हे कळत असलं तरी हुरळून जाऊन निर्णय घ्यायचे नसतात. कारण रंगीबेरंगी आयुष्यातली आणि वेड्या वयातली प्रेमप्रकरणे (काही अपवाद वगळता) अल्पायुषी असतात.'प्रत्यक्ष जीवन' हे त्या वयात पाहिलेल्या स्वप्नांपेक्षा वेगळं असतं.आणि म्हणूनच तरुणी स्वत:च्याच भावनाना घाबरते.भावना तरी काय हो, त्या गुलाबी वातावरणात आणि त्या वयात आपल्या भावना पण फसव्या असतात.कारण आईबापांच्या पंखाखाली राहून निर्णय घेण्याईतके आपण लहान नसतो आणि स्वत:च्या चुकीच्या निर्णयांचे परीणाम शूरपणे भोगण्याइतके मोठे पण नसतो. अशा वेळी मनाचं बंद करुन टाकायचं असतं आत काय आहे हे न पाहता. आणि तरुणीने मनाचं दार बंद करुन टाकलं, पण 'त्या'ने निराशेने पाठ फिरवल्यावर तिला जरा वाईट वाटलं.आता रोजच्यासारखा तो अवतीभोवती दिसणार नाही या कल्पनेने मन जरा उदास झालं.(रोजच्या वाटेत असलेलं झाड कुणी तोडलं किंवा रोज कडेला बसणारा चांभार पण एखाद्या दिवशी दिसला नाही तरी आपल्याला चुकल्याचुकल्यासारखं वाटतं.) आणि या अशा अवस्थेच्या सुरुवातीला तिने केलेली ही कविता.
आपली(प्रेम-तत्वज्ञानी)अनु