मी ही गोष्ट प्रथम वाचली तेव्हा माझी उत्स्फूर्त प्रतिक्रिया "फँटॅस्टिक!" अशीच होती. 'जे जे आपणासी आवडे, ते ते इतरांसी सांगावे' ह्या माझ्या स्वभावातून हा अनुवाद मी इथे दिला. आपण सर्वांनी ती कथा आणि अनुवाद दोन्ही आवडल्याचे सांगितले त्याबद्दल आपले आभार.
आपल्यापैकी काहींनी मूळ कथा आधी वाचलेली होती, तरीही त्यांना हा अनुवाद आवडला हे वाचून मला फार बरे वाटले.
मी गेली जवळजवळ १९ वर्षे महाराष्ट्राबाहेर रहात आहे. त्यामुळे दूरचित्रवाणीवरील मराठी कार्यक्रम आम्हाला अगदी परवापरवापर्यंत बघायला मिळत नव्हते. त्यामुळे ज्या मराठी मालिकेचा एक भाग ह्या कथेवर आधारित होता ती मी अर्थातच पाहिलेली नाही. ही कथा कशी सादर केली असेल याबद्दल मला उत्सुकता आहेच.
मीरा