१. 'ओट' म्हणजे मराठीमध्ये काय?

नक्की माहीत नाही, पण बहुधा 'जव' असावे, असे वाटते. ('सातू' असण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.) (चूभूद्याघ्या.)

२. नाचणीच्या पीठाची खीर कशी करावी? नाचणीचे तिखटमीठाचे काही पदार्थ करता येतात का?

कल्पना नाही. क्षमस्व.

३. पनीर घरी करण्याइतका वेळ नसेल तर परदेशात काही पर्याय उपलब्ध आहे का? "कॉटेज चीज" चा वापर पनीर सारखा करता येउ शकतो का?

भारतात 'पनीर'चे इंग्रजी भाषांतर जरी 'कॉटेज चीझ' असे सर्रास केले जात असले, तरी निदान अमेरिकेत तरी बाजारात 'कॉटेज चीझ' म्हणून जे काही मिळते, ते कन्सिस्टन्सी व टेक्श्चरमध्ये (मराठी प्रतिशब्द?) पनीरच्या जवळपासदेखील नसते. ते साधारणपणे गुठळ्या असलेले, अर्ध-घन-अर्ध-द्रव असे काहीसे असते. त्यामुळे त्याचा पनीरसारखा उपयोग मुळीच करता येणार नाही, असे मला तरी वाटते.

सोया प्रथिनांपासून बनणारे 'तोफू' अथवा 'बीनकर्ड' हे कन्सिस्टन्सी व टेक्श्चरमध्ये थोडेफार पनीरसारखे असते खरे, पण त्याची चव नेमकी पनीरप्रमाणे लागत नाही. त्यामुळे दुसरा पर्याय नसल्यास ते चालू शकेल, परंतु त्यात ती मजा नाही.

परंतु इथे उत्तर अमेरिकेत तरी (संयुक्त संस्थाने, कॅनडा) एखाद्या बऱ्यापैकी मोठ्या गावात/शहरात जर आपण राहत असाल (विशेषतः जेथे भारतीयांची लोकसंख्या बऱ्यापैकी आहे अशा एखाद्या ठिकाणी), तर सहसा तुमच्या गावात/शहरात एखादे तरी भारतीय किराणामालदुकान (ग्रोसरी स्टोअर) असतेच असते, आणि हल्ली बहुतेक वेळा अशा दुकानांत तयार पनीर मिळते. ते आपण वापरू शकता.

४. बाजरी ला इन्ग्रजीमधे काय म्हणतात?

माझ्या माहितीप्रमाणे बाजरीला इंग्रजीत 'मिलेट' (millet) असे म्हणतात.

५. ज्येष्ठ्मधाला इन्ग्रजीमधे काय म्हणतात?

लिकोरिश (अमेरिकेत licorice, ब्रिटनमध्ये liquorice). (संदर्भ: मोल्स्वर्थ शब्दकोश.)

- टग्या.