व्यक्त-अव्यक्त,

आपण परदेशी म्हणजे नेमके कुठे आहात हे सांगितलेत तर तुम्हाला अधीक नेमकी माहिती देता येईल.  तसेच आपण किती दिवसासाठी परदेशात आहात.  तुम्ही एकटेच आहात का वगैरे खुलासा केलात तर बरे होईल.

काही उत्तरे इथे देत आहे.

१.  ओट म्हणजे सातु किंवा सत्तु.  हे गव्हाच्या जातीतले धान्य आहे.  आपण लहानपणी भूगोलात शिकला असाल की ३० ते ५० अक्षांशामधल्या प्रदेशातली मुख्य पिके गहू, ओट, आणि बार्ली ही असतात.  भारतात मुख्यत्वे पंजाब आणि पाकिस्तानात पंजाब, वायव्य सरहद्द प्रांत याठिकाणी ही पिके येतात.  बार्लीला संस्कृतात यव म्हणतात.  आपल्याकडे श्राद्धकर्मामध्ये यव वापरले जातात.
ओट्स हे पाश्चिमात्य देशात सकाळच्या न्याहरीकरता वापरतात.  तसेच ते घोड्यांना चारा म्हणून मोठ्या प्रमाणात वापरतात.

२.  नाचणीच्या पिठाची खीर अगदी सोपी आहे.  एका भांड्यात पाणी उकळवत ठेवा.  थोड्या गार पाण्यात नाचणीचे पीठ भिजवून ते उकळत्या पाण्यात टाका.  त्यात चवीसाठी साखर, गूळ, मध असे गोडी आणणारे पदार्थ घाला, खीर (लापशी) तयार.
सहसा नाचणीच्या पिठापासून तिखट-मीठाचे पदार्थ केलेले पाहिले/ऐकले नाहीत.  नाचणी-धान्याची फोडणी करून खिचडी केलेली खाल्ली आहे.

३.  पनीर साठी पर्यायी म्हणून सोया पासून बनविलेले टोफू सहज वापरले जाते.  अर्थात त्याला पनीर सारखी चव नसते.  पण ते कोलेस्टोराल विरहित असल्याने तब्येतीला जास्त चांगले.

४.  बाजरीला नाव माहिती नाही, पण मिलेट नावाचे धान्य बाजरीच्या जवळचे आहे.

५.  ज्येष्ठमधीला ईंग्रजीमध्ये लिकोरिस असे म्हणतात.

आपल्याला वरील उत्तराचा उपयोग होईल अशी आशा आहे.

कलोअ,
परभारतीय