इथे भारतीय किराणा मालाच्या दुकानात मिळणारे पनीर बऱ्यापैकी जुने असते असा अनुभव आहे...
हा अनुभव मलाही क्वचित आलेला आहे, पण नेहमी असे होत नाही. (शिळा माल खपवण्याची भारतीय व्यापाऱ्यांची वृत्ती कितीही नाही म्हटले तरी ही अशी अधूनमधून डोकावतेच, ही दुःखाची गोष्ट आहे. आणि दर वेळेला हे मुद्दाम फसवण्याच्या हेतूनेच होते, असेही नाही. बऱ्याचदा केवळ निष्काळजीपणाने/बेफिकिरीमुळे होते. भारतीय व्यापारीवर्ग अजूनही पुरेसा ग्राहकसंमुख नाही, याचेच हे द्योतक आहे, असे वाटते. परंतु तो वेगळा विषय आहे.) पण मिनिआपोलिस-सेंट पॉल सारख्या मोठ्या शहरविभागात निश्चितच एकापेक्षा अधिक भारतीय किराणामालाची दुकाने असावीत, असे वाटते. कदाचित थोडे दूर जावे लागेल, पण कोठे ना कोठे ताजे पनीर मिळावयास हरकत नसावी, असे वाटते. (अटलांटात ताजे पनीर मिळायला मला तरी आजतागायत त्रास झालेला नाही. एखाद्या ठिकाणी क्वचित नाही मिळाले / शिळे ('सेल बाय' तारीख उलटून गेलेले) मिळालेच, तर दुसरे दुकान गाठतो. कोठेतरी मिळतेच मिळते.) बाय् द वे, 'नानक' ब्रँड (मिळाल्यास) वापरून बघा. या ब्रँडला खप बऱ्यापैकी आहे, त्यामुळे माल शक्यतो चालू शकण्याइतपत ताजा मिळतो, असा माझा तरी अनुभव आहे.
पूर्वी पार्ले ग्लुको बिस्किटांचे असेच व्हायचे. कधीकाळी कोणाच्यातरी प्रवासी सामानातून आलेली बिस्किटे विकत असावेत, अशी शंका यायची. दोनतीन वर्षांपूर्वीचा मऊ पडलेला, फुटकातुटका माल मिळत असे. परंतु हल्ली परिस्थिती सुधारली आहे. भारतातून थेट अधिकृत पुरवठा (एक्स्पोर्ट पॅक) होऊ लागल्यापासून बऱ्यापैकी ताजा माल सुमारे एका डॉलरला सहा ते सात पुडे या भावाने सहज मिळतो. एवढेच नव्हे, तर चितळ्यांची बाकरवडी, लक्ष्मीनारायण चिवडा आणि केप्रचा मसालाही बऱ्यापैकी ताजा निदान अटलांटात तरी आरामात मिळतो. एकंदरीत प्रगती आहे. असो.
ज्येष्ठमध मिळण्याबाबत (कधी प्रयत्न केलेला नसल्यामुळे) कल्पना नाही. भारतीय दुकानांत चौकशी करून पहावी.
- टग्या.