ही जोहारी विंडो नाही. जोहारी विंडो मध्ये एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट गुणधर्मांची जाण कोणाला आहे आणि कोणाला नाही यानुसार खालील चार भाग केलेले आहेत.

व्यक्तीचे असे गुणधर्म ज्यांच्याविषयी व्यक्ती:

  1. स्वतः जाणत नाही, इतरही जाणत नाहीत (Unknown)
  2. स्वतः जाणत नाही, इतर जाणतात (Blind)
  3. स्वतः जाणते, इतर जाणत नाहीत (Hidden)
  4. स्वतः जाणते, इतरही जाणतात (Open)

माझ्यामते सारंग यांची कविता यापेक्षाही सूक्ष्म पातळीवर वर्गीकरण करते,

  1. ज्याला जाण नाही आणि आपल्याला जाण नाही हे ज्याला माहीत नाही
  2. ज्याला जाण नाही आणि आपल्याला जाण नाही हे ज्याला माहीत आहे
  3. ज्याला जाण आहे आणि आपल्याला जाण आहे हे ज्याला माहीत नाही
  4. ज्याला जाण आहे पण आपल्याला जाण आहे हे ज्याला माहीत आहे

आपला,
(विश्लेषक) शशांक