:)) मला धुमारे तर नाही फुटले, पण तुझा प्रतिसाद पाहून हर्षवायू मात्र झाला. :)

झाडावेलींवर धुमारे फुटायला आणखी दोनेक आठवडे जावे लागतील असे वाटते. अगदी साहित्यिक भाषेत बोलायचे तर सध्या ऋतु बदलवणारे 'चैतन्याचे वारे' सुटले आहेत. पण हे वारे एवढे गारेगार आहेत की कानाचे दडे बसून नाक चेहऱ्यावरून गळून पडते की काय असे होते अधुन-मधुन. :) तर असो. जास्त विषयांतर नको. प्रतिसादाबद्दल पुनश्च आभार!  काळजी घे. (टेक केअर याच्या अशा कृत्रिम भाषांतराऐवजी माझ्या एका मित्राने मला 'जीवाला जप' असा भावानुवाद सुचविला आहे. कसा वाटतो?)