वा वेदश्री,

आपण आश्वत्थाम्यावरचं वेगळ्या दृष्टीकोनातून केलेलं निरिक्षण मांडलत त्याबद्दल आपलं कौतुकच करायला हवं. आश्वत्थामा एका गरीब ऋषीपुत्राच्या घरातला असल्यानं त्याला जरी अध्यात्मिक अधिष्ठाण जन्मानं मिळालं तरी तो मोठा झाला ते स्वतःच्या चिकाटीनं व कुषलतेनं वा प्रचंड कर्तबगारीवर. पण म्हणून त्याच्या चुकांना पाठीशी घालनं तात्विक रित्या इतिहासकारांना भावलं नसेल. आणी तसं पहायला गेलं तर स्वतः श्रीकृष्णाला सुध्दा चुकांची शिक्षा ही भोगाविच लागली ना. आपल्या आजच्या कायद्यानं सुद्धा कितीही सज्जनाने हत्या वगैरे पापं केली तरी त्याला सुध्दा कठोर शिक्षा होतेच की (उदाहरण बघतोच आहोत)!

आश्वत्थामा महान होता म्हणून कदाचित त्याचा फक्त मणी काढला असावा अन्यथा हात-पाय तोडण्यासारखी भयंकर शिक्षा सुध्दा त्याने केलेल्या पापापाई सहज देता आली असती.

.... हा सर्वस्वी माझा व्यक्तिगत भावनांचा आणि विचारांचा भाग आहे.. कृपया कोणी रागवू नये... मलाही अशाच आशयाचे काहीतरी लिहायचे होते पण आळसापायी कॉपी-पेस्ट केले. आपला copy right तर नाही ना!

आपला,

(आळशी) भास्कर