भास्करशी मी सहमत आहे. आपण केलेल्या कर्माचे आपल्याला फळ भोगावेच लागते.
पण मला काही प्रश्र्न पडले आहेत. (मी अजून म्रुत्युंजय वाचलेले नाही. )
१) आपणा सर्वाना त्याची बालपणातली दुधाची गोष्ट माहीत आहेच.
पण जेव्हा द्रोणाचार्य कौरव-पांडवांचे गुरु बनले, तेव्हा कौरव-पांडव छोटे होते. आणी माझ्या मते अश्वत्थामा हा त्यांचा समवयस्क होता.
म्हणजे तो ही छोटाच होता. त्यामुळे त्याचे पूर्ण बालपण गरीबीत गेले असेल का? कारण गुरुवर्य बनल्यावर ते श्रीमंत बनलेच असणार.
तसेच पुर्वीच्याकाळी विद्यार्जनासाठी पैशाची गरज नव्हती.
२) अश्वत्थामा ज्ञानी होता हे खरे. पण त्याचे गुरु हे त्याचे पिता होते.
त्यामुळे माझ्या मते त्याला ज्ञानप्राप्ती त्या मानाने सहजच झाली. (अर्थात ज्ञानप्राप्ती साठी कष्ट लागतातच.)
इथे त्याच्यापेक्षा मला एकलव्य श्रेष्टः वाटतो.
आणी जेव्हा ब्रम्हास्त्र पाठी घ्यायचे होते ते द्रोणशिष्य अर्जुनाला सहज जमले, पण तेच द्रोणपुत्राला जमू नये.
त्याच्या पित्याला हे ज्ञान असताना तेच ज्ञान हा आत्मसात करु शकला नाही. त्याला आपण असामान्य म्हणू शकतो का?
यापूर्वी मी अश्वत्थामाविषयी कधीच विचार केला नव्हता. पण वेदश्रीच्या लेखाने मलाही अंतर्मुख केले. म्हणून तुझे कोतुक!!!
(अज्ञानी) ज्ञानेश.