आंबिल करण्यासाठी ३-४ चमचे नाचणीचे पीठ थोड्या ताकात आदल्या दिवशी रात्री कालवून ठेवावे. म्हणजे दुसऱ्या दिवशी ते आंबते. मग आंबिल करताना छायाताईंनी सांगितल्याप्रमाणे थोडे आंबट ताक आणि थोडे पाणी घालून उकळावे. फोडणी घातली नाही तरी चालते. नाचणी थंड असल्याने उन्हाळ्यात आंबिल प्यायली जाते. सर्वसाधारणपणे आंबील पातळ केली जात असल्याने ३-४ चमचे पिठापासून अंदाजे ४-५ भांडी आंबिल तयार होते. आंबिल तयार करताना त्यात नुसते मीठ घालून मग वरून लसणीची चटणी घातली तरी चालते.
तांदुळाच्या पिठाची उकड करतात तशी नाचणीच्या पिठाची उकडही करता येते. कृती साधारण आंबिलीप्रमाणेच. फक्त क्रम उलटा म्हणजे आधी फोडणी मग ताक उकळविणे आणि मग त्याला नाचणीचे पीठ लावणे.
शिवाय नाचणीच्या पिठाची भाकरी. भाकरीबरोबर कोणतीही पालेभाजी, पिठले, वांगी वगैरेची रसभाजी चांगली लागते.
रव्याच्या गोडाच्या शिऱ्याप्रमाणे नाचणीचा शिरा (साखर किंवा गूळ घालून) केला जातो.