परदेशी असलेल्या व पनीर आवडणाऱ्या दुसऱ्या एका भारतीय पोटाचे हे आणखी काही प्रश्न -

१. १ लिटर दूध फाडून पनीर केल्यास ते किती होते? चारांसाठी पनीर बटर मसाला भाजी एका जेवणापुरती करायची असल्यास किती दुधाचे पनीर करावे?

२. डी विटॅमिन दूध, २%, १% दूध वगैरे कोणत्याही दुघाचे पनीर चांगले होते, वा एखादे विशिष्ट दूधच वापरावे?

३.  १ लिटर दुधाचे पनीर करण्यासाठी १ लिंबू असे प्रमाण आहे काय? दूध कमी वापरल्यास लिंबाच्या रसाचे प्रमाणही त्यानुसार कमी करावे का?

४. लिंबाचा रस कमी-जास्त झाल्याने पनीराची चव, पोत वगैरे बदलू शकते का?

५. लिंबाच्या रसाऐवजी विनेगर वापरल्यास त्याचे प्रमाण लिंबाच्या रसाएवढेच असावे का?