भारताबाहेर महाराष्ट्रातल्या वस्तू मिळू नयेत (सरसकट नव्हे तरी काही ठिकाणी) हे आजच्या उद्यमशील जगातले आश्चर्यच म्हणावे.
येथे भारतीय लघूउद्योजक भारताबाहेरील बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असताना, दुसऱ्या बाजू कडील खंत वेगळीच असावी हे अधिक नवल.
महाराष्ट्रातल्या काही उद्यमशील तरुणांना संधी मिळाल्यास मराठी वस्तू नक्कीच तेथे उपलब्ध करता येतील असे मला वाटते.
आपण सर्वांनीच मराठी माणूस उद्योगात मागे आहे असे वाटू न देता पुढाकार घ्यावा हेच ह्या निमित्ताने सांगणे.
मी करण्यालायक काही असल्यास जरूर करायची तयारी आहे.