पु. शि. रेग्यांची ही प्रसिद्ध कविता येथे दिल्याबद्दल आभार. कविता छोटेखानी पण प्रभावी आहे. कुठल्याशा एका समीक्षणात अल्पाक्षररमणीयता हे रेगे यांच्या कवितेचे व्यवच्छेदक लक्षण आहे असे वाचले होते आणि 'अल्पाक्षररमणीयता' या भल्यामोठ्या शब्दातला विरोधाभास तेव्हा जाणवला होता. :-)
असो. संसिद्ध याचा अर्थ सिद्ध/तयार असा असावा असे वाटते. (चू.भू.द्या.घ्या.)
नंदन