पूर्वी "मी त्याची हजामत केली" (उपहासात्मक अर्थाने) ऐवजी "मी त्याची 'केली'" असेही म्हणण्याची पद्धत होती. पैकी 'ची' हा षष्ठीचा प्रत्यय असल्याने, "मी त्याची षष्ठी केली", असेही म्हणण्यात येऊ लागले.
तेव्हा 'एखाद्याची षष्ठी करणे' म्हणजे 'एखाद्याची हजामत करणे'.
'खरडपट्टी'चाही हजामतीशी संबंध असणे अगदीच अशक्य नाही. वस्तऱ्याने (विशेषतः बिनपाण्याने) जास्त हळुवारपणा न वापरता हजामत केल्यास अत्यंत क्लेशदायक होऊ शकते, व अशा हजामतीच्या क्रियेचे 'खरडणे' (किंवा 'तासणे') या शब्दप्रयोगाने सार्थ वर्णन होऊ शकते. यातूनच 'खरडपट्टी'चा उगम झाला असावा.
- टग्या.