एखाद्या घरात काही काळापुरते एकत्र राहणे व आयुष्यभरासाठी एकत्र राहणे या वेगळ्या गोष्टी आहेत.

सहमत. जागेची आणि/किंवा आर्थिक सोय म्हणून असे एकत्र राहण्याला काही आक्षेप असावा असे वाटत नाही.

एखाद्या घरमित्राशी/मैत्रिणीशी लग्न करावेसे वाटू शकते; पण घरमित्र/मैत्रिण असण्यासाठी लग्न करण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. (विशेषतः भारतात, कारण आपण लोक सहसा एकदाच लग्न करतो.)

सहमत.

(भिन्नलिंगी लोक एका घरात राहिले तर त्यांच्यामध्ये लैंगिक संबंध असायलाच पाहिजेत हे गृहीतक कश्याच्या आधारावर मांडले आहे ते कळले नाही.)

मलाही कळले नाही.

जसे कोणे एके काळी शाळेत मुलगा-मुलगी बोलताना दिसले की त्यांचे 'जमले' आहे असे समजून चिडवायचे, हे तसलेच गृहीतक आहे असे वाटते.

पुढे अभियांत्रिकीला कोणी कोणत्या मुलीला (किंवा उलटे) लिफ्ट दिली तर त्यांचे 'जमले' अशी कुजबूज व्हायची, हे तसलेच गृहीतक आहे असे वाटते.

मुलं-मुली चांगले मित्र असू शकतात, लैंगिक आणि/किंवा प्रेम संबंधाशिवाय एकत्र राहू-बोलू-हिंडू-फिरू शकतात हा विचार आपल्या लोकांना करता येत नाही असे वाटते.