नीलहंस,
इस बार बहुत इंतजार करवाया आपने!
ही गझल नेहमीपेक्षा अधिक 'तरल' (subtle) तसेच 'गहन' आहे. दुसऱ्या वाचनात कळते. पण 'शोकसभे'चा शेर,आशयाला धक्का न लावता, थोडा 'सोपा' करता येईल का? विनंतीला रागावू किंवा हसू नकोस.
नुसतीच ढगांची नभात गर्दी झाली
प्रणयातुर वारा तहानलेला होता
--- हा शेर खास आहे. मला का कोण जाणे पण 'बहुत प्यास है पर जवानी है कम' ही ओळ आठवली.
जयन्ता५२