कैक दिसांची अमुची संगत
सोडून-तोडून गेला वेडा
सतार माझी तूटुन गेली
कशास आता तारा छेडा
त्याची आठवण, त्याची गोडी
मनात माझ्या, माझ्या देही
क्रूर जग हे म्हणते मजला
तुम्ही झाला हो मधुमेही
असे हे जग अन,असा हा वेडा
सांगा, मग कसा सुटेल तिढा ?
मज वाटे तो माझा प्रियतम
तुम्ही ज्याला म्हणता पेढा !
-अभिजित पापळकर